बेताची परिस्थिती… आर्थिकदृष्ट्या मागास…दोन एकर शेती मात्र दुष्काळ, उत्पन्नाचे काहीच साधन नसल्याने साऱ्या कुटुंबाने ओझर गाठले आणि मिळेल ते काम करु लागले..ओझर येथील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील अभिजीतने गरुडने तलाठी परिक्षेत यश मिळवले. ही खरी सोपी गोष्ट नाही. पण अभिजीतने करून दाखवले.
अभिजितचे पहिली ते दहावी शिक्षण चिंचोडी येथे झाले. विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पाथर्डी तालुक्यातील आदीनाथनगरमधील दादा पाटील महाविद्यालयात पूर्ण केले.अभिजीतने देखील कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी काम करु लागला. त्यास ओझर येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघात केमिस्ट म्हणून नोकरी लागली.
आयुष्यात अधिकारी व्हायचेच असा निश्चय त्याने केला. पण, परिस्थिती साथ देत नव्हती. त्यातच क्लास लावण्यासाठी पैसेही नव्हते. म्हणून घरीच अभ्यास करु लागला.तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने नोकरी देखील सोडली. त्यानंतर अभिजीतने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले.
२०२३ ला पोलिस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षा दिली असून, त्याचा निकाल बाकी आहे. यासह कर सहाय्यक २०२३ मुख्य परीक्षा, मंत्रायलयात लिपिक २०२३ पदाच्या मुख्य परीक्षा दिल्या त्यांचाही निकाल अद्याप बाकी आहे.तलाठी परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी अभिजीतची आरोग्य विभागात निवड झाली होती. आरोग्य विभागात रुजू होणार तोच त्याची तलाठी म्हणून निवड झाली.या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात अभिजित यास २०० पैकी १९५ गुण मिळाले आहेत. आयुष्यात काही तरी करण्याची जिद्द, प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर मिळवलेले हे यश सगळ्यासाठी खरोखरच कौतुकास्पद आहे आणि प्रेरणादायी आहे