⁠
Inspirational

मुलांनी कष्टाचे पांग फेडले…आई भाजी विक्रेती, रोजंदारी कामगाराची मुलं बनली पोलीस !

झोपडपट्टीमधील जीवन… अत्यंत गरिबीची परिस्थिती, आईने भाजी विक्री करून मुलांना उच्च शिक्षित केले.तर वडील उल्हासनगर कॅम्प नं-३ विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील गोपाळ समाजपाडा झोपडपट्टीत राहणारे राशन दुकानात रोजंदारीचे काम करतात.

विठ्ठलवाडी गोपाळ समाजपाडा झोपडपट्टीतील घर अत्यंत लहान असल्याने, दोन वर्षांपूर्वी हाटकर कुटुंब खडगोलावली येथे भाड्याच्या खोलीत पोलीस असणाऱ्या मोठया भावाकडे राहण्यास गेले.

रुपेश, दिनेश, विकास व मंगेश असे चार मुले असून अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी चारही मुलांना उच्च शिक्षण दिले.सर्वात मोठा मुलगा रुपेश ३ वर्षांपूर्वी ठाणे जिल्हा पोलीस मध्ये भरती झाल्यानंतर, त्याच्या पेक्षा तिन्ही लहान भावांना पोलीस सरावासाठी अंबरनाथ येथील पोलीस ॲकॉडमीमध्ये टाकले. चारही भावाचे प्राथमिक शिक्षण उल्हासनगर महापालिका शाळेत तर माध्यमिक शिक्षण शांतिग्राम शाळेत झाले. तसेच पदवीचे शिक्षण शहरातील आरकेटी महाविद्यालयात झाले.

मोठ्या भावाचे आदर्श समोर ठेवून ऑक्टोबर महिन्यात ठाणे पोलीस मध्ये लेखी व मैदानी परीक्षा तिन्ही हाटकर भावाने दिली. त्यापैकी दिनेश व विकास हे दोन्ही भाऊ ठाणे पोलीस दलात भरती झाल्याची नियुक्ती यादी १० जानेवारीला प्रसिद्ध झाली. अत्यंत हलाकीच्या परिस्थिती मध्ये सख्खे दोन्ही भाऊ पोलीस दलात भरती झाल्याने, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच सर्वात लहान भाऊ मंगेश यालाही पोलीस दलात जायचे आहे. मुलांनी आई वडिलांच्या कष्टाचे व मोठया भावाचा आदर्श ठेवून पोलीस भरती झाली.

Related Articles

Back to top button