⁠
Inspirational

शेतकऱ्याच्या लेकीची सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती !

Success Story : मुलींना प्रोत्साहन दिले आणि गगनभरारी घ्यायला पाठबळ दिले तर मुलगी नक्कीच आपल्या पायावर भक्कम उभी राहू शकते. हेच वेदिका टेर्लेच्या घरच्यांनी केले. तिला अभ्यासाला पाठिंबा दिला आणि अधिकारी होण्यासाठी कायम प्रोत्साहित केले. वेदिका ही निफाड तालुक्‍यातील शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेली कन्या.

वेदिकाचे माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. पुढे क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदविका, तर गोखले अभियांत्रिकीमधून पदवी मिळविली. क. का. वाघ अभियांत्रिकीमधून पदव्युत्तर पदवी मिळवून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर ती स्पर्धा परीक्षेकडे वळली. आपल्या संपूर्ण परिस्थितीची जाण असलेल्या वेदिकाने शिक्षण पूर्ण करतानाच इतर अडचणींवर मात करीत प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय बाळगले.

अभियांत्रिकी शिक्षणाच्या जोरावर तिने विविध शासनाच्या सरळ सेवा परीक्षा देण्यास सुरुवात केली. यापैकी १६ डिसेंबर २०२३ ला झालेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सरळसेवा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता ‘गट ब’ या पदावर तिची निवड झाली. ग्रामीण भागातील परीक्षार्थींना आता योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने संधी विस्तारित आहे. हे वेदिकाच्या प्रवासावरून दिसून येते

Related Articles

Back to top button