⁠  ⁠

Supreme Court Recruitment : भारतीय सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीचा चान्स, 210 जागा रिक्त

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Supreme Court Recruitment 2022: पदवी पास उमेदवारांना भारतीय सर्वोच्च न्यायालय नोकरी करण्याचा मोठा चान्स आहे. सर्वोच्च न्यायालयातमध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (गट ‘ब’) या पदांच्या २१० जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : २१०

पदाचे नाव: ज्युनियर कोर्ट असिस्टंट (ग्रुप-B)

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (iii) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयाची अट: 01.07.2022 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षे. सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC/शारीरिकदृष्ट्या अपंग/ माजी सैनिक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या आश्रितांना वयात नेहमीची सूट दिली जाईल.

परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : पे मॅट्रिक्सचा लेव्हल 6 मूळ वेतन रु. 35,400/-. HRA सह भत्त्यांच्या विद्यमान दरानुसार अंदाजे एकूण वेतन रु. 63068/- दरमहा.

नोकरी ठिकाण : दिल्ली

परीक्षेची योजना :
पात्र उमेदवारांना खालील विषयांच्या परीक्षेत बसावे लागेल:-

100 प्रश्नांचा समावेश असलेल्या बहुपर्यायी उत्तरांसह वस्तुनिष्ठ प्रकार प्रश्नपत्रिका (आकलन विभागासह 50 सामान्य इंग्रजी प्रश्न, 25 सामान्य योग्यता प्रश्न आणि 25 सामान्य ज्ञान प्रश्नांचा समावेश आहे).
वस्तुनिष्ठ प्रकार संगणक ज्ञान चाचणी (२५ प्रश्न)
संगणकावर टायपिंग (इंग्रजी) चाचणी किमान गती 35 w.p.m. चुकांच्या कपातीनंतर (3% चुकांना परवानगी आहे)
वर्णनात्मक चाचणी (इंग्रजी भाषेत) ज्यामध्ये आकलन उतारा, अचूक लेखन आणि निबंध लेखन यांचा समावेश होतो

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.sci.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article