⁠  ⁠

Talathi Bharti : तलाठी पदाच्या 4122 जागांसाठी मेगाभरती जाहीर, तुमच्या जिल्ह्यात नक्की किती जागा रिक्त?

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Talathi Bharti 2022 : काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने MPSC मार्फत लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती करण्यासाठी नुकताच निर्णय घेतला होता. यानंतर आता राज्यातील ४ हजार १२२ तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून त्यास राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती शासनास पाठविण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातारवण आहे.

राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी 29 नोव्हेंबरला स्वतंत्र पत्र काढून तलाठी संवर्गातील 31 डिसेंबर 2022 रोजी रिक्त होणारी 1012 पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे, असे एकूण 4122 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहीरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार असल्याने आयोगाकडे वेळेत माहिती पाठविण्याबाबत स्पष्ट आदेशही दिले आहेत.

Talathi Bharti : कोणत्या विभागात किती पदे भरणार?

नाशिक – १०३५
औरंगाबाद – ८७४
कोकण – ७३१
नागपूर – ५८०
अमरावती – १८३
पुणे – ७४६

नाशिमध्ये सार्वधिक १०३५ तर अमरावती विभागात १८३ जागा येत्या १५ दिवसांमध्ये माहिती देणे आहे बंधनकारक सर्वच माहिती विहीत नमुन्यात विवरण पत्रात भरुन जिल्हानिहाय प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त करुन १५ दिवसांत सादर करण्याचे आदेशही दिले आहे. त्यामुळे आता सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना वेळेत माहिती देण्याचे आदेश दिले आहे.

नाशिक विभाग – 1035 जागा
Nashik (नाशिक) 252 जागा
Dhule (धुळे) 233 जागा
Nandurbar (नंदुरबार) 40 जागा
Jalgaon (जळगाव) 198 जागा
Ahamednagar (अहमदनगर) 312 जागा

औरंगाबाद विभाग – 847 जागा
Aurangabad (औरंगाबाद) 157 जागा
Jalna (जालना) 95 जागा
Parbhani (परभणी) 84 जागा
Hingoli (हिंगोली) 68 जागा
Nanded (नांदेड) 119 जागा
Latur (लातूर) 50 जागा
Beed (बीड), Osmanabad (उस्मानाबाद) 164 जागा , 110 जागा

कोकण विभाग – 731 जागा
Mumbai City (मुंबई शहर) 19 जागा
Mumbai Suburban (मुंबई उपनगर) 39 जागा
Thane (ठाणे) 83 जागा
Palghar (पालघर) 157 जागा
Raigad (रायगड) 172 जागा
Ratngairi (रत्नागिरी) 142 जागा
Sindhudurg (सिंधुदूर्ग) 119 जागा

नागपूर विभाग – 580 जागा
Nagpur (नागपूर) 125 जागा
Wardha (वर्धा) 63 जागा
Bhandara (भंडारा) 47 जागा
Gondia (गोंदिया) 60 जागा
Chandrapur (चंद्रपूर) 151 जागा
Gadchiroli (गडचिरोली) 134 जागा

अमरावती विभाग – 183 जागा
Amravati (अमरावती) 46 जागा
Akola (अकोला) 19 जागा
Yavatmal (यवतमाळ) 77 जागा
Washim (वाशीम) 10 जागा
Buldhana (बुलढाणा) 31 जागा

पुणे विभाग – 746 जागा
Pune (पुणे) 339 जागा
Satara (सातारा) 77 जागा
Sangali (सांगली) 90 जागा
Solapur (सोलापूर) 174 जागा
Kolhapur (कोल्हापूर) 66 जागा

image

दरम्यान, अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांचे पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे भरल्यास शासनाने काम गतीमान होऊन शेतकरी तसेच नागरिकांचे प्रश्नही यामुळे सुटणार आहेत. या निर्णयाचे आता सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

तलाठी भरतीमधील रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा, तलाठी भरतीचा अभ्यासक्रम याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

एकूण मान्यता पदे : 4122
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

Talathi Bharti Age Limit | वयोमर्यादा :

सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
मागास प्रवर्ग: 19 ते 43
नोकरीचे ठिकाण : ऑल महाराष्ट्र
किती पगार मिळेल?
Talathi Salary : महाराष्ट्रातील तलाठी पगार तपशील हा उमेदवारांसाठी सामान्य प्रश्न आहे. तलाठ्यासाठी पगाराचा निकष रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400.

परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
मराठी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
इंग्रजी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
सामान्य ज्ञान – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
बौद्धिक चाचणी – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
एकूण – प्रश्नांची संख्या 100 आणि एकूण गुण 200

Talathi Bharti syllabus | तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम :

मराठी :
मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

English :
Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

सामान्य ज्ञान :
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

बौद्धिक चाचणी :
बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

Share This Article