⁠  ⁠

प्रतीक्षा संपली! राज्यात ‘या’ तारखेपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्रात चार हजाराहून अधिक तलाठी पदांची भरती होणार आहे. मात्र अद्यापही याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीय. त्यामुळे उमेदवार या भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. त्या ठिकाणी ते बोलत होते.

दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patill) यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

तलाठी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

किती पगार मिळेल तुम्हाला?
विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक :
शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)
अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
जातीचा दाखला (Caste Certificate)
नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

कोणत्या विभागात किती पदे भरणार?
नाशिक – १०३५
औरंगाबाद – ८७४
कोकण – ७३१
नागपूर – ५८०
अमरावती – १८३
पुणे – ७४६

Share This Article