दूरसंचार विभाग पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
एकूण जागा – 270
रिक्त पदाचे नाव : उपविभागीय अभियंता
शैक्षणिक पात्रता : केंद्र किंवा राज्याच्या कायद्याद्वारे अंतर्भूत केलेल्या विद्यापीठातून “इलेक्ट्रिकल” किंवा “इलेक्ट्रॉनिक्स” किंवा ‘इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन’ किंवा ‘कॉम्प्युटर सायन्स’ किंवा “टेलिकम्युनिकेशन्स’ किंवा ‘माहिती तंत्रज्ञान’ किंवा ‘इंस्ट्रुमेंटेशन’ मधील अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. पात्रतेसंबंधी अधिक माहिती नोटिफिकेशनमध देण्यात आली आहे.
वयाची अट : अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेनुसार अर्जदाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वेतन : उपविभागीय अभियंता – 1,51,100/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धत : ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : ADG-1(A & HR), DGT HQ, रूम नंबर 212, 2रा मजला, UIDAII इमारत, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली -110001
अधिकृत संकेतस्थळ : dot.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा