---Advertisement---

TMC ठाणे महानगरपालिका भरती २०२१

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत विविध पदांच्या एकूण 42 रिक्त जागांसाठ भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 जून 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2021 आहे.

एकूण जागा : ४२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full Time Medical Officer १४
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician १९
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. सह डीएमएलटी अनुभव असल्यास प्राधान्य

३) औषध निर्माता/ Pharmacist ०८
शैक्षणिक पात्रता : डी.फार्म / बी.फार्म अनुभव असल्यास प्राधान्य

४) कार्यक्रम सहाय्यक/ Program Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर ०२) MS-CIT ०३) मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.

वयोमर्यादा : ३८ ते ७० वर्षे.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – ६०,०००/-
२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २९,४००/-
३) औषध निर्माता – १९,५८४/-
४) कार्यक्रम सहाय्यक – १९,३३९/-

अटी व शर्ती

१) अर्जदाराचे अर्जा सोबत प्रमाणपत्राच्या साक्षंकित सत्य प्रती जोडाव्यात. ( जन्मतारिख,शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्र व मार्कशिट, अनुभव आणि शासन निर्णयानुसार जतीचा दाखला इत्यादी)

२) अर्जामध्ये संपुर्ण नाव पत्ता, जन्मातारिख, शैक्षणिक अर्हता, पुर्वानुभव नमुद करावा, तसेच अर्जासेबत पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा.

३) अनु.क्र १,३ या पदासाठी नोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र असणे आवश्क आहे.

४) नेमणूकी संदर्भात ठाणे महागनरपालिकेने घेतलेले सर्व निर्णय अंतिम राहतील.

५) शासकिय सेवेत असलेल्या उमेदवारांनी कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

६) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत सदरची पदे करारपध्दतीने अस्तित्वात राहतील तसेच नेमणूक झालेल्या उमेदवारास ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत कोणताही हक्क सांगता येणार नाही.

७) नियुक्त झालेल्या उमेदवारांना ११ महिन्यांकरिता नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्याचा Performance Report बघून पुर्ननियुक्ती देण्यात येईल.

८) एका पदासाठी १० किंवा १० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या त्या संवर्गात एका पदासाठी गुणवतेनुसार कट ऑफ लाऊन एकास पाच या प्रमाणात पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

९) मुलाखतीची तारिख व वेळ उमेदवारांस इमेलद्वारे कळविण्यात येईल तसेच ठाणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल.

१०) मुलाखतीनंतर निवड यादी व प्रतिक्षा यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल तसेच निवड झालेल्या उमेदवारास ईमलद्वारे नियुक्ती आदेश पाठविण्यात येतील.

११) जाहिरातीमध्ये प्रसिध्द केलेल्या पदांमध्ये वाढ/कमी करण्याचे अधिकार महापालिकेने राखून ठेवलेले आहेत तसेच जाहिरातीत काही सुधारणा असल्यास तसे शुध्दिपत्रक प्रसिध्द करण्यात येईल.

नोकरी ठिकाण : ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 जून 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now