तऱ्हाळा गावच्या एकाच कुटुंबातील तिन्ही लेकी पोलिस खात्यात !

समाजातील अजून मुलींच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी विरोध झालेला दिसून येतो. तसाच विरोध या तीन लेकींना देखील झाला. त्यांना गाव व समाजाची चिंता सतावत होती लोक काय म्हणतील? एकतर पोलीस खात्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत…ते दूर कसे करायचे मुलींकरता क्षेत्र योग्य असेल का? यातून स्वतःची ओळख निर्माण करत प्रिया ,भाग्यश्री , श्रद्धा या तिघींची पोलिस खात्यात नियुक्ती झाली आहे.

वाशीम मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा गावाच्या ह्या रहिवासी आहेत. घरी सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून असले तरी यांच्या आई – वडिलांनी मुलींच्या शिक्षणासाठी पाठिंबा दिला.

शेती देखील वाट्याला जेमतेम आली असल्याने मोलमजुरीवर उदरनिर्वाह चालवतो. पण आई-वडिलांच्या कष्टाचे त्यांच्या मुलींनी सोनं केले आहे. या तिन्ही बहिणींचे शालेय शिक्षण गावाच्या जिल्हा परिषद शाळेत झाले तर थोरली मुलगी प्रिया…तिने बारावीनंतर पोलिस खात्यात जायचा ध्यास घेतला.‌ ती या अपार मेहनतीवर पोलीस दलात नोकरी लागली.

थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत भाग्यश्री आणि श्रद्धानेही पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सद्या प्रिया वाशीमच्या आसेगाव पोलीस स्थानकामध्ये तर भाग्यश्री आणि श्रद्धा या दोघी अकोला येथे कर्तव्य बजावत आहेत.पोलीस दलात मोठ्या पदावर जाण्याच तिन्ही बहिणींचे स्वप्न आहे.