⁠
Inspirational

टीनू एक-दोन नाहीतर तब्बल 5 सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा उत्तीर्ण !

आपण जिद्दीने अभ्यास केला तर यशाची पायरी गाठता येते.तसेच बिहारमधील टीनू सिंह एका तरुणीने एक-दोन नाही तर तब्बल पाच सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा पास केली. तिने आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिच्या आईला घरची परिस्थिती बेताची असल्याने अधिकारी बनता आले नाही. त्यामुळे त्या गृहिणीच राहिल्या. मात्र, आईचे स्वप्न मुलीने पूर्ण केले आहे.

टिनू मूळची बिहार जमुई येथील आहे. तिचे वडील मुन्ना सिंग सीआरपीएफमध्ये सब इन्स्पेक्टर आहे. टिनूचे एकच स्वप्न होते की, ती सरकारी अधिकारी व्हावी. टिनूचे हे स्वप्न साकार करण्यासाठी तिने मेहनतीच्या जोरावर एक-दोन नव्हे तर पाच स्पर्धा परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण करून इतिहास रचला आहे. टिनूला पाच नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या आहे. नोकरी मिळवण्यासाठी तिने मोठी मेहनत घेतली. शेवटी तिच्या मेहनीला यश मिळाले आणि तिने एकाचवेळी ५ सरकारी परिक्षांत मोठी झेप घेतली. २२ ते २६ डिसेंबर या पाच दिवसांत तिला ५ सरकारी नोकऱ्यांसाठी ऑफर आल्यात. तिने या यशासाठी फक्त आणि फक्त मेहनत केली.

वरिल तीन परीक्षांशिवाय बीपीएसच्या शिक्षक भरती परिक्षेतही टीनूला ६-८च्या कॅडरमध्ये यश मिळाले. याशिवाय बीपीएससीच्या शिक्षक भरतीमध्ये उच्च माध्यमिकच्या कॅडरमध्येही यश मिळाले. टीनू तिच्या यशाचे श्रेय आपल्या आई -वडिलांना देते.

Related Articles

Back to top button