⁠  ⁠

UIDAI मध्ये विविध पदांसाठी भरती ; पगार १ लाख ७० हजार रुपये

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI मध्ये विविध पदांसाठी भरती चालू आहे. या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही संधी तुम्हाला आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडा.त्यानंतर अर्ज लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

UIDAI मध्ये उपसंचालक आणि वरिष्ठ लेखाधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवाराला १ लाख ७० हजार रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्ष असावी.या नोकरीसाठी ७व्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात येणार आहे. उपसंचालक पदासाठी ६७ हजा ७०० ते २ लाख ८० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. तर वरिष्ठ लेखाधिकारी पदासाठी ५६ हजार ते १ लाख ७७ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
तुम्हाला अर्ज भरुन संचालक (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ब्लॉक वी, पहिला मजला,हाउसफेड कॉम्प्लेक्स, दिसपूर, गुवाहाटी येथे पाठवायचा आहे.

Share This Article