⁠  ⁠

UPSC परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; तारखा जाणून घ्या

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

UPSC Exam Time Table 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा २०२५ चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे. या परिपत्रकामध्ये परीक्षेच्या तारखा, अर्ज भरण्याची अंतिम तारीख यांची माहिती देण्यात आली आहे.

यूपीएससी परिक्षा वेळापत्रकानुसार नागरी सेवा परीक्षा, अनडीए, सीडीए, वनसेवा, भूशास्त्रज्ञ अशा परीक्षा घेण्यात येणार आहे. २२ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत या परीक्षा घेण्यात येणार आहे. नागरी सेवा परीक्षा २०२५, भारतीय वनसेवा परीक्षा म्हणजेच यूपीएससी पूर्वपरीक्षा २०२५ ची एकत्रितपणे नोंदणी करु शकणार आहे. ही परीक्षा २५ मे रोजी होणार आहे.नागरी सेवा पूर्व परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २२ ऑगस्टपासून नागरी सेवा मुख्य परिक्षा २०२५ घेतली जाणार आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (NDA-ANA) परिक्षा २०२५ आणि समाईक संरक्षण सेवा (CDA) परीक्षा २०२५ साठी नोंदणी ११ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान करण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a comment