⁠  ⁠

महाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

दिल्लीस्थित महाराष्ट्रातील वरिष्ठ आयएस, आयपीएस आणि इतर अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या सोबतच दिल्लीतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधील अनुभवी प्राध्यापक, संशोधक व्यक्ती हे गेल्या चार वर्षांपासून ‘एमआयपी’ (मॉक इंटरव्ह्यू पॅनल) उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी मोफत मार्गदशन उपलब्ध करून देत आहेत.
या उपक्रमाद्वारे गेल्या चार वर्षांत दीडशेपेक्षा जास्त महाराष्ट्रीय उमेदवारांनी लाभ घेतला असून, ते आजमितीस संपूर्ण देशात भारतीय प्रशासनाच्या सन्माननीय पदांवर कार्यरत आहेत. यूपीएससी २०१८च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व महाराष्ट्रीय उमेदवारांना दिल्लीत ४ फेब्रुवारी २०१९ पासून एमआयपी अभियानाद्वारे मुलाखतीत घवघवीत यश मिळावे यासाठी अनुभवसंपन्न तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीची तयारी करून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीची छायाचित्रण सीडी, त्यांच्या मुलाखतीचा वैयक्तिक मूल्यांकन अहवाल आणि त्याबाबत अधिक सकारात्मक बदलाबाबत मौलिक सूचना असा परिपूर्ण अहवाल मोफत मिळणार आहे. तरी इच्छुकांसाठी संपर्क- www.ektatrust.org.in, ९६५४८९५७५३, [email protected], ९०२९६९४९८०, ९९३०८६९३५३.

Share This Article