शाळेत अतिशय मस्तीखोर..शिक्षकांच्या वारंवार तक्रारी यायच्या, पण मेहनतीने आदित्य झाला IAS अधिकारी!
UPSC IAS Success Story : खूपदा शाळेत मस्ती करणारी मुले की भविष्यात काही तरी चांगले करून दाखवतात हे दिसून येते. तसाच, बिहारची राजधानी पाटणा येथील बिशुनपूर पाकडी या गावातल्या आदित्य पांडेचा प्रवास…. शाळेतून शिक्षकांच्या वारंवार तक्रारी येणारा आदित्य ते आज आयएएस अधिकारी कसा झाला, आदित्य पांडेचा प्रवास जाणून घेऊयात.
त्याचे शालेय शिक्षण हे गावातच झाले.एकदा त्याच्या शिक्षिकाने त्याच्या वडिलांकडे तक्रार केली आणि सांगितले, जर आदित्य त्याच्या अभ्यासात गंभीर झाला तर मी माझ्या मिशा काढून टाकेन. एवढा मस्तीत पटाईत होता. पुढे बारावीनंतर पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून बी.टेक शिक्षण केले. त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. त्यानंतर आदित्य पांडेने आयआयटी रुरकीमधून एमबीए केले.
या आधारित त्याने काही वर्षे नोकरी सुध्दा केली. पण यात काही मन रमले नाही म्हणून त्याने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. यात तो दोनदा नापास झाला. पण खचून गेला नाही. पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली.आदित्य पांडेने २०२२ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले.ऑल इंडिया ४८ वा रँक मिळवून तो आयएएस अधिकारी झाला