⁠  ⁠

अवघ्या २२व्या वर्षी अनन्या झाली आय.ए.एस अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story : काही विद्यार्थी हे अधिक जिद्द आणि उत्कटतेमुळे अगदी लहान वयात यश मिळवतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे IAS अनन्या सिंगची..जिने अवघ्या २२व्या वर्षी युपीएससीची परीक्षा दिली आणि यश मिळवले.

अनन्या ही मूळची उत्तर प्रदेश येथील प्रयागराज या भागातील रहिवासी आहे. तिने सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ती शालेय जीवनापासून अभ्यासात हुशारच होती. त्यामुळे तिला दहावीच्या परीक्षेत ९६% मिळाले तर बारावीच्या परीक्षेत ९८.२६% मिळाले. तिच्या या यशामुळे नेहमीच ती टॉपर राहिली.‌ त्यानंतर ती दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्रातील पदवीसाठी गेली.

पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने यूपीएससीची तयारी केली. कारण आयएएस अधिकारी बनण्याची तिची लहानपणापासूनची इच्छा होती. या दरम्यान तिने मुख्य परीक्षा दिल्यानंतर उत्तरे लिहिण्याचा सराव पुन्हा सुरू केला. तिने केवळ एक वर्षाचा स्व-अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण केली. सुरुवातीला ती रोज ७-८ तास अभ्यास करायची. तिने २०१९ मध्ये पहिलाच प्रयत्न केला आणि त्याचवेळी ती अवघी २२ वर्षांची होती. तरी देखील तिने २२व्या वर्षी युपीएससीची परीक्षेत यश मिळवून आय.ए.एस अधिकारी झाली‌.

Share This Article