---Advertisement---

पहिल्या अपयशानंतर दुसऱ्या प्रयत्नात बनली IAS ; वाचा अंकिताचा प्रेरणादायी प्रवास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story कोणतेही अपयश आले तरी हरून जायचे नाहीतर तर पुन्हा नव्याने उभे राहायचे.‌हेच अंकिताने प्रवासातून दाखवून दिले.जिद्द आणि दृढनिश्चयाने जगात काहीही असू शकते यासाठी तिचा प्रवास प्रेरणादायी आहे.

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील अंकिताने २०१७ मध्ये पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षेचा प्रयत्न केला. परंतू, ती अपयशी ठरली. ज्या चूका झाल्या त्यात तिने सुधारणा केली. पुन्हा नव्याने अभ्यासला लागली. अंकिता चौधरी ही हरियाणाच्या रोहतकमधील मेहम जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी. अत्यंत निम्न-मध्यमवर्गीय घरात झाले. तिचे वडील साखर कारखान्यात लेखापाल कामास होते. त्यांनी अंकिताच्या शैक्षणिक वाटचालीत खूप मोठी मदत केली. त्यामुळे, ती लहानपणापासूनच तिला स्वतंत्र आणि स्वावलंबी होण्याची आकांक्षा निर्माण झाली.

तिचे अंकिताने दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून रसायनशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर, यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. यात पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राममध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तिने तयारी करण्यास सुरुवात केली. आयआयटी दिल्लीमधून पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षांसाठी पूर्ण तयारी सुरू केली. तिचा आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. अंकिताच्या आईचा ती शिकत असताना कार अपघातात मृत्यू झाला होता. यामुळे, अंकिताला खूप धक्का बसला, पण तिने जिद्द तोडू न देण्याचा निर्णय घेतला.

त्याऐवजी, त्यांच्या दिवंगत आईचा सन्मान करण्याचा मार्ग म्हणून तिने आयएएस अधिकारी बनण्यासाठी धडपडत राहिली, ज्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना अतुलनीय पाठिंबा दिला. अंकिताने २०१८ मध्ये दुसऱ्यांदा युपीएससीची परीक्षा दिली.यावेळी, तिने अखिल भारतीय रँक १४वी मिळविली. ती तिच्या यशाचे श्रेय तिच्या वडिलांच्या प्रयत्नांना आणि कठोर परिश्रमाला देते.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts