⁠
Inspirational

दिव्याखाली बसून केला अभ्यास अन् अंशुमन झाला IAS अधिकारी !

UPSC IAS Success Story बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावात अंशुमन राजचे बालपण गेले. अत्यंत साधे कुटूंब, सोयी सुविधांचा अभाव…. त्यामुळे दिव्याखाली बसून अभ्यास करायला लागायचा. अंशुमन यांच्या वडिलांचा गावातच छोटा व्यवसाय होता. पण काही कारणास्तव त्यात देखील नुकसान झाले. त्यामुळे अंशुमनची आई १५०० रूपये महिन्यावर घर चालवायची, असे असताना देखील अंशुमनची जिद्दी मात्र कमालीची होती.

आता शिक्षणाचे काय? पुढे कसे शिकायचे असे प्रश्न समोर होते. म्हणून, त्यांनी नवोदय विद्यालयाची परीक्षा देण्याचे ठरवले.त्याने नवोदय विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पुढील शिक्षणासाठी बारावीच्या अभ्यासासाठी रांचीच्या नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला. त्यापुढे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

आपल्याला इतक्यावरच थांबून चालणार नाही म्हणून त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.कोणतेही कोचिंग क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडी करुन अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत मिळवलेल्या रँकनुसार त्याला IRS पद देण्यात आले होते. या पदावर त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला. अंशुमनला आयएएस अधिकारी बनायचं होतं. पहिली परीक्षा पास झाल्यानंतर त्याने सलग दोनदा युपीएससीची परीक्षा दिली, पण या दोन्ही प्रयत्नात त्याला अपयश आले. मात्र खचून न जाता त्याने तयारी सुरुच ठेवली. २०१९ मध्ये त्याने पुन्हा एकदा चौथ्या प्रयत्नात कुठलेही कोचिंग क्लासेस न लावता उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात ७ वी रँक मिळवली.
खरंतर, एक सामान्य लोकांचा गैरसमज आहे की जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर मोठ्या शहरात युपीएससीची तयारी करणे आवश्यक आहे. पण ही गोष्ट अंशुमने मोडीत काढली.

तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असल्यास तुम्ही देशात कुठूनही परीक्षेचा अभ्यास करू शकता. त्यांनी देखील प्रत्येक अपयशानंतर आपल्या उणीवा सुधारण्यासाठी वाव दिला आणि प्रयत्न पुढे चालू ठेवले आणि चौथ्या प्रयत्नात आपले उद्दिष्ट साध्य करण्यात ते यशस्वी झाले. सध्या ते मध्य प्रदेश मध्ये आयएएस अधिकारी म्हणून काम बघत आहेत.

Related Articles

Back to top button