⁠
Inspirational

संघर्षातून केली कमाल ; वाचा IAS अंशुमन राज यांच्या जीवनाची कहाणी…

UPSC IAS Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटलं की, संघर्ष हा आलाच. सामान्य घरातून आलेल्या मुलाने असामान्य काम केलं की अधिक प्रेरणादायी ठरते.ज्याच्या घरी ब्लबची पण सुविधा नव्हती तरी दिव्याखाली बसून अभ्यास केला….ते आज आय.ए.एस अधिकारी झाले आहेत. वाचा IAS अंशुमन राज यांच्या जीवनाची कहाणी…

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील अंशुमन राज हे रहिवासी. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची होती. त्यांना घरात बल्ब देखील लावणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी दहावीपर्यंत तो रॉकेलच्या दिव्याखाली शिकत मोठे आले. त्याच्या घरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने त्याला सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. साधनांच्या कमतरतेमुळे ते कधीच हरले नाहीत. तर जिद्दीने लढले.

दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते जवाहरलाल नवोदय विद्यालय (JNV) मध्ये शिकण्यास गेले. तिथे त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांचा युपीएससी परीक्षेकडे जास्त कल निर्माण झाला. त्याचे यूपीएससीचे स्वप्न आणि दिल्लीतील तयारीचा खर्च त्याच्या कुटुंबाला परवडत नसला तरी त्यांनी लढण्याचे ठरवले. त्याच्या पालकांना त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आणि जमीन विकण्यास भाग पाडण्याऐवजी, त्याने कोणतेही प्रशिक्षण न घेता स्वत: तयारी करण्याचा निर्णय घेतला. या काळात मित्र आणि ओळखीच्या लोकांकडून नोट्स गोळा करण्यासाठी खूप धडपड केली, परंतू कधीही हार मानण्याचा विचार केला नाही. त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले, त्याने यशस्वीरित्या आयआरएस पद मिळवले. मात्र, आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न होते.
म्हणून, त्याने पुन्हा प्रयत्न करण्याचे ठरवले. १०७ रॅंकसह आय.ए.एस हे पद मिळवले. संसाधनांच्या कमतरतेची तक्रार करणाऱ्या आणि गरीब असल्याचा दोष आपल्या कुटुंबियांना देणार्‍या अनेकांसाठी हा प्रवास प्रेरणादायी आहे.

Related Articles

Back to top button