नातीने केले आजोबांचे स्वप्न पूर्ण; अपराजिता बनली IAS अधिकारी !
UPSC IAS Success Story युपीएससी (UPSC) परीक्षेत यशस्वी होण्यासाठी संघर्ष आणि चिकाटीला अधिक महत्त्व आहे. याच जोरावर अपराजिता शर्मा आयएएस अधिकारी झाल्या.आयएएस अधिकारी अपराजिता शर्मा (Aparajita Sharma) यांची ही यथोगाथा नक्की वाचा.
बनारसच्या रहिवासी असलेल्या अपराजिता शर्मा यांना आयएएस अधिकारी कोण असतात? हेही माहीत नव्हते. ही परीक्षा कशी पास करायची? याची तिला कल्पना नव्हती पण तरीही, लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिचे आजोबा तिला नेहमी सांगत असतं की त्यांची नात एक दिवस अधिकारी होईल. अपराजिताला लहानपणी अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं. पण जेव्हा ती मोठी होऊ लागली तेव्हा अपराजिताने ते गांभीर्याने घेतले आणि करिअर म्हणून निवड केली.
अपराजिताच्या मते, या पदामुळे केवळ प्रतिष्ठाच नाही तर समाधानही मिळते. अपराजिताने २०१७ मध्ये ४०व्या क्रमांकासह ही परीक्षा उत्तीर्ण केली. यासोबतच तिचे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले. अपराजिताचे शालेय शिक्षण बनारसमधून झाले, त्यानंतर तिने पदवीसाठी रांचीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. तिचे वडील आयआरएस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आणि तिची आई प्राध्यापक आहे. पदवीनंतर अपराजिताला एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. तिच्या विभागात ती एकटीच मुलगी होती. तिच्या कंपनीत घडलेल्या काही घटनांनी अपराजिताला प्रेरणा दिली आणि त्यानंतर तिने नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न केला.
अपराजिता ह्या तीनही परीक्षांच्या तयारीसाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या. त्यांच्या मते, सर्व प्रथम, अभ्यासक्रम कोणता आहे हे समजून घेतले पाहिजे आणि आपल्या आवडीनुसार व अभ्यासक्रमानुसार पुस्तके गोळा करणे आवश्यक आहे. आपल्या मर्यादित पुस्तकात पुन्हा उजळणी करणे अधिक महत्त्वाचे आहे. रोजची उद्दिष्टे ठरवा आणि ती पूर्ण केल्यास यश मिळते.
अपराजिता यांनी हा युपीएससीचा अभ्यास करताना NCERT पुस्तकांना खूप महत्त्व देते. तिने सहावी ते बारावीपर्यंत एनसीईआरटीच्या जास्तीत जास्त विषयांची पुस्तके वाचली, विशेषत: भूगोल विषयाचा जास्त अभ्यास केला. यानंतर तिने वर्तमानपत्रांवर लक्ष केंद्रित केले. मुलाखतीच्या वेळी कसे बोलावे याविषयी सल्ला देताना म्हणतात की, प्रामाणिकपणे आणि तुमच्या मनात जे आहे…ते बोलणे चांगले होईल कारण इथे तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा होत असते. आयएएस अधिकारी अपराजिता शर्मा यांची हा प्रवास नक्कीच चिकाटीचा आहे.