सुरक्षा रक्षकाच्या मुलाची गरुडझेप ; बनला IAS अधिकारी !
UPSC IAS Success Story : ओडिशातील भद्रक येथील सुरक्षा रक्षकाचा मुलगा अतुल सिंग याने युपीएससीच्या परीक्षेमध्ये ६७ रॅंक मिळवून IAS अधिकारी होण्यासाठी एक प्रभावी कामगिरी केली आहे. आपल्या यशाच्या मार्गात कधीही आर्थिक परिस्थिती आड येऊ दिली नाही. आज सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या आपल्या वडिलांना युपीएससी उत्तीर्ण करून IAS अधिकारी बनण्याचा अभिमान वाटला.
अतूल सिंगचे वडील ओडिशातील भद्रक येथील शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सुरक्षा रक्षक म्हणून रात्रंदिवस काम केले, ते आपल्या मुलाच्या यशानंतर खूप आनंदित आहेत. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतूल दररोज १२-१४ तास अभ्यास करायचा आणि हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे. अतूल हा सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी होता.
तो खूप मेहनत करायचा. तो कानपूर एनआयटीचा विद्यार्थी असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर रिलायन्समध्ये काम करत होता. त्यानंतर,आपला यूपीएससी प्रवास सुरू केला. दिवसरात्र मेहनत करून युपीएससी सारखी परीक्षा उत्तीर्ण झाला.त्यास आय.ए.एस हे पद देखील मिळाले.