UPSC IAS Success Storyआपल्याला भरघोस पगाराची नोकरी हवी, हे अनेकांचे स्वप्न असते. पण आयुष गोयल यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याच्या इच्छेमुळे चांगल्या पगाराची नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा ध्यास घेतला.आयुष गोयल हे मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आणि देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने तब्बल वार्षिक २८ लाख रुपयांचा पगाराची नोकरी सोडली. त्यांचे वडील सुभाषचंद्र गोयल हे किराणा दुकानाचे मालक आहेत, तर त्यांची आई मीरा गृहिणी आहे.
त्याने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९१.२% आणि १२वी बोर्डाच्या परीक्षेत ९६.२% गुण मिळवले. आयुषने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आणि कॅट परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कॅट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्याने केरळमधील आयआयएम कोझिकोड येथे एमबीए केले. त्यानंतर, आयुष त्याने एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी खाजगी कंपनीत नोकरी केली.म्हणून आयुषला नोकरी मिळाल्याने त्याच्या आई-वडिलांना आनंद झाला पण मुलाच्या निर्णयाने त्यांच्या आनंदावर विरजण पडले.आठ महिन्यांच्या नोकरीनंतर, आयुषने ते अर्धवट सोडले कारण त्याला फक्त यूपीएससी परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचे होते.
आयुषने युपीएससीसाठी दीड वर्ष घरीच अभ्यास केला आणि त्यासाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही. ते ट्यूटोरियल व्हिडिओ पाहताना तो दिवसातील आठ ते दहा तास नॉनस्टॉप अभ्यास करत असे. या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आय.ए.एस पदापर्यंत गगनभरारी घेतली.