---Advertisement---

आर्मी ऑफिसरच्या लेकीचे अवघ्या 22 व्या वर्षी झाले IAS होण्याचे स्वप्न पूर्ण…

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story स्पर्धा परीक्षेची तयारी बरेचजण करत असतात. पण अगदी काही जण पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होतात. IAS चंद्रज्योती सिंग ही त्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. ह्या निवृत्त लष्करी अधिकार्‍यांची मुलगी असून चंद्रज्योतीचे वडील कर्नल दलबारा सिंग यांनी आर्मी रेडिओलॉजिस्ट म्हणून काम केले. तर त्यांची आई लेफ्टनंट कर्नल मीन सिंग.

घरचे वातावरण हे आर्मी ऑफिसरचे असल्याने त्यांच्या आई-वडिलांनी तिला शिक्षणासाठी आणि आयुष्यात चांगले काम करण्याची नेहमीच प्रेरणा दिली.त्यांचे शालेय शिक्षणाची तजालंधर एपीजे स्कूलमधून झाली. तर बोर्ड पूर्ण केल्यानंतर त्यांनी चंदीगड भवन विद्यालयातून बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.तसेच, त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून इतिहासात ऑनर्स पदवी घेतली आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चंद्रज्योती यांनी पूर्णतः युपीएससीची तयारी सुरू केली. या वैयक्तिक कारणांमुळे पुढील शिक्षणासाठी एका वर्षाचा ब्रेक घेतला.

त्यांनी जेव्हा पहिला प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हा त्या अवघ्या २२ वर्षांच्या होत्या. वर्षांभरातील अथक परिश्रमाने त्यांनी ऑल इंडिया रँक (AIR)-२८ रॅंकसह युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी होण्यासाठी पात्र ठरल्या. सध्या, चंद्रज्योती सिंह पंजाब केडरचे आयएएस अधिकारी आहेत आणि मोहालीचे एसडीएम म्हणून कार्यरत आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts