UPSC Success Story आपली जिद्द, चिकाटी असेल तर कोणतेही उद्दिष्ट साध्य करणे सोपे होते. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे एक आव्हानात्मक आणि लांबलचक प्रक्रिया आहे. यात यश मिळतेच असे नाही…अपयशाचा देखील सामना करावा लागतो. असेच देव चौधरी, आयएएस अधिकारी, ज्यांनी २०१६ मध्ये युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. चौथ्या प्रयत्नात देव यांनी हे यश मिळवले होते.
ते मूळचे राजस्थानमधील बाडमेरचे असून त्याचे वडील सुजनराम हे शिक्षक होते. देव यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेतूनच पूर्ण केले.तर बाडमेरच्या महाविद्यालयात बी.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. हे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. देव कुमार यांनी हिंदी भाषेतून शिक्षण घेतले. त्याच्या यूपीएससीच्या तयारीदरम्यान हिंदी अभ्यास साहित्य शोधणे हे त्याच्यासाठी मोठे आव्हान होते.
त्यांनी यूपीएससीची तयारी दिल्लीतून केली. जेव्हा देव चौधरीने २०१२ मध्ये पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली तेव्हा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली. परंतू ते मुख्य परीक्षेत नापास झाले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्या, पण मुलाखतीच्या वेळी अपयश आले. असे तीनदा झाले. पण देव चौधरी यांनी चौथ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. ते सध्या गुजरातच्या अहमदाबाद येथे जिल्हाधिकारी (IAS) म्हणून कार्यरत आहेत.