⁠
Inspirational

लहान असतानाच वडिल वारले, आईने शेती मजूरी शिकवलं ; दिव्या झाली IAS अधिकारी!

UPSC IAS Success Story लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मात्र, तिने परिस्थितीशी मात्र केली. तिचा प्रेरणादायी संघर्ष पाहून, एखादी गोष्ट करण्याचे मनाशी घट्ट ठरवल्यानंतर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही हे दिसून येते. स्पर्धा परीक्षा देणे आणि त्यात उत्तीर्ण होणे हे दिव्याचे लहानपणीपासूनचे स्वप्न होते. वाचा दिव्याची यशोगाथा…

दिव्या तनवार ही हरियाणामधील महेंद्रगड येथील रहिवासी.२०११ साली दिव्या केवळ ८ किंवा ९ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण कुटुंबाला सांभाळण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी दिव्याची आई, शेतामध्ये मजुरीची कामे करत असे. तसेच शिवणकाम करून दिव्या आणि तिच्या दोन भावंडांचा सांभाळ करायची.त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. तिचे शालेय शिक्षण हे सरकारी शाळेमध्ये झाले आहे. नंतर तिची महिंद्रगडमधील नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आली होती. पुढे दिव्याने विज्ञान क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच तिने ताबडतोब स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

चाचणी परीक्षांचा वापर करून, प्रचंड मेहेनत दिव्याने घेतली. तिने २०२१ मध्ये तिने आपली पहिला प्रयत्न केला त्यात संपूर्ण देशात ४३८ वा क्रमांक पटकावला. दिव्या भारतातील सर्वात कमी वयात IPS बनलेली पहिली व्यक्ती ठरली.परंतु, दिव्या इतक्यावरच थांबली नाही. तिने पुन्हा २०२२ साली पुन्हा परीक्षा दिली. यात तिने देशभरातून १०५ हे स्थान पटकावले आणि IAS बनली.

Related Articles

Back to top button