---Advertisement---

पोटात असतानाच वडील वारले, आईने दारू विकून शिकवलं, मुलगा बनला भिल्ल समाजातील पहिला कलेक्टर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story डॉ. राजेंद्र भारूड यांचा जन्म साक्री तालुक्यातील सामोडे गावात झाल. लहानपणापासून आयुष्य हे भिल्ल जमातीत गेल्यामुळे पावलोपावली संघर्ष सोसावा लागला. घरची परिस्थिती बेताची होती पण स्वप्न मात्र कमालीची होती.

जेव्हा ते आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांचे वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. वडील कसे होते हे त्यांना कधीच कळलं नाही. त्यांच्याकडे ना जमीन होती ना शेती…घरात कर्ता पुरुषही नव्हता. त्यांची आईचं दिवसभर राबायची आणि सगळी जबाबदारी पडायची. त्यांची आई पोटाची खळगी भरण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. पण पोराने शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी ती झटत होती.

त्याला मोठया भावाला आश्रमशाळेत घातले होते तर राजेंद्र यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ते शाळेत जाऊन मन लावून शिकायचे. पण पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे. लहानपणापासून शिक्षणाची गोडी होती. त्यांच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती. त्यांनी पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. ही शाळा गावापासून १५० किमी दूर होती. त्यांना दहावीला उत्तम गुण मिळाले तर बारावीला ९७ टक्के गुण मिळाले. स्वतःच्या गुणांच्या जोरावर त्यांनी मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. याच दरम्यान त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी एकीकडे इंटर्नशीप चालू केली पण दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास.

खरंतर त्यांच्या समाजाला यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. पण ते आयएएस ऑफिसरची तयारी जोमाने करत होतो. वर्षांच्या शेवटी एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि दुसरीकडे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा निकाल हातात होता.

याविषयी सांगताना डॉ. राजेंद्र भारूड म्हणतात की, “मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं”. मित्रांनो, आपण कोणत्या समाजातून येतो यापेक्षा आपण कसं शिकतो हे महत्त्वाचे आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts