⁠
Inspirational

चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS अधिकारी ! वाचा देशल यांचा प्रेरणादायी प्रवास

UPSC IAS Success Story : आपली गरीब परिस्थिती असली तरी शिक्षणाची ओढ ही कायम आयुष्याला कलाटणी देते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजस्थानमधील देशल दान रतनू . त्याचे वडील हे चहाची टपरी चालवतात. यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. तर मोठा भाऊ भारतीय नौदलात होता. देशल त्यांना आपलं प्रेरणास्थान मानतात. त्यांनी सांगितलं की, त्यांचा भाऊ २०१० मध्ये हुतात्मा झाला होता.

त्यांच्या मोठ्या भावालाही अधिकारी व्हायची इच्छा होती. त्याची इच्छा देशलने पूर्ण केली. त्याचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. पुढे त्यांनी आयआयआयटी जबलपूरमध्ये प्रवेश मिळाला. जिथून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करण्याबरोबर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दोन वेळचं जेवणही अनेकदा मिळत नव्हते. अशा अनेक प्रसंगांतून देशलला सामना करायला लागला.

इतकेच नव्हे तर चांगलं शिक्षण घेण्यासाठी घरात पुरेसे पैसे नव्हते. पण, त्यांनी अभ्यास मेहनतीनं सुरू ठेवला.अहोरात्र मेहनत आणि परिस्थितीची जाण…यामुळेच, पहिल्याच प्रयत्ना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासह ८२ वा क्रमांक मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं.राजस्थानातील एका खेड्यात चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीचा सामान्य मुलगा आज अधिकारी झाला आहे.

Related Articles

Back to top button