⁠  ⁠

ईश्वरीया रामनाथन अवघ्या 24 व्या वर्षीय बनली आयएएस ऑफिसर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Story : परिस्थितीची जाणीव ठेवून जर मनात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठी लागणारे सातत्य व अथांग मेहनत करण्यासाठी आपण तत्पर असतो. असेच यश मिळवले आहे ऐश्वर्या रामनाथन यांनी.

ईश्वर्या या तटीय जिल्ह्यातील कोद्दालोर येथील रहिवासी आहेत. ऐश्वर्या यांचे वडील शेतकरी व आई सरकारी अधिकारी होत्या. त्यांच्या आईचे लग्न लहान वयातच झाले आणि त्या काळात त्यांच्या आईला सरकारी नोकरी मिळाली. जसे आपण यश मिळवले तसेच आपल्या मुलीने देखील मिळवावे अशी ईश्वर्याच्या आईची इच्छा होती, त्यामुळे नेहमी त्यांना कुटुंबीयांनी प्रोत्साहित केले.

ऐश्वर्या यांच्यावर अनेकदा महापूर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाचे सावट राहिले आहे. या बिकट परिस्थितीत त्यांनी 2004 साली आलेल्या सुनामीच्या काळात कलेक्टर गगनदीप सिंग बेदी यांना काम करताना पाहिले. त्यांच्या कामाने प्रेरित झाल्याने त्यांचे आयुष्यच बदलणे व त्यांनी देखील यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. व दोनदा यूपीएससीची परीक्षा दिल्यानंतर अवघ्या 24व्या वर्षी ईश्वरीया रामनाथन या आयएएस ऑफिसर झाल्या.

Share This Article