⁠  ⁠

परिस्थितीशी संघर्ष करून बनले IAS अधिकारी; वाचा मोहम्मद अली शिहाब यांची यशोगाथा…

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

UPSC IAS Success Story : सध्या स्पर्धा परीक्षेच्या युगात दिवसेंदिवस बरीच स्पर्धा वाढत चालली आहे. यात कोणाला यश मिळते तर कोणाला अपयश मिळते. आयपीएस मोहम्मद अली शिहाबची अशीच एक कहाणी आहे ज्यांनी अनेक आव्हानांचा सामना करूनही आपले स्वप्न कधीही सोडले नाही. एक काळ असा होता की त्यांना अनाथाश्रमात राहावे लागले. पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत राहिले. त्यांना भाषेचा अडसर असूनही, मोहम्मद यांनी ऑल इंडियामधून २२६ वा क्रमांक काढला. आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांसाठी २१ परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांनी शिपाई, रेल्वे तिकीट परीक्षक आणि जेल वॉर्डन म्हणूनही काम केले. तर तिसऱ्या प्रयत्नात ते आयपीएस अधिकारी बनले.

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील मोहम्मद हे रहिवासी. त्यांच्या वडिलांचे नाव कोरोत अली आणि आईचे नाव फातिमा होते. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्यामुळे शिहाब यांनी वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या आणि पान विकायला सुरुवात केली. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईच्या खांद्यावर आली. त्यांना तिला पाच मुलांचा सांभाळ करणे अशक्य होते. त्यामुळेच आईने त्यांना अनाथाश्रमात सोडले होते.शिहाब यांची आई शिकलेली नव्हती. आपल्या मुलांचे पोट भरू शकेल अशी कोणती नोकरी तिला मिळत नव्हती.

त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. याची जाणीव ठेवून ते आश्रमात रात्री आठ वाजता ते जेवण करायचे आणि त्यानंतर मध्यरात्री अभ्यासाला उठायचे. टॉर्चच्या मंद प्रकाशात अभ्यास सुरू असायचा. बाजुला झोपलेल्या आश्रमातील मित्रांची झोप मोड होऊ नये, याची काळजीही मुहम्मद घ्यायचे. मुहम्मद यांना रेग्युलर कॉलेज करायचं होतं. त्यासाठी घरी येऊन त्यांनी घरच्यांशी चर्चाही केली. पण, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांना घरातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. केरळच्या पाणी प्राधिकरणात काम करताना त्यांनी कालिकत विद्यापीठात दूर शिक्षणासाठी अर्ज केला आणि तेथून बीएची पदवी घेतली.

या सगळ्या प्रकारामुळे वयाच्या २७व्या वर्षी त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. अनाथश्रमात पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.एखादं काम आपल्याला जमलं नाही तर, अनेकजण परिस्थितीवर दोष देऊन रिकामे होतात. पण, परिस्थितीशी संघर्ष करून जग जिंकणारे मोजकेच असतात. तसेच त्यांनी परिस्थितीशी सामना केला. आपल्या मेहनतीने त्यांनी २०११ मध्ये यूपीएससीत २२६ रँक मिळवून यश मिळवले.तिसर्‍या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारे मोहम्मद शिहाब सध्या नागालँड कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

Share This Article