⁠
Inspirational

अवघ्या २२ व्या वर्षी बनली आयएएस ऑफिसर! वाचा सिमी करणचा प्रेरणादायी प्रवास

खरंतर कमी वयात जास्तीत जास्त अभ्यास करण्याची क्षमता असते. हे खरं आहे. सिमी करण हिने करून दाखवले. ती मूळची ओडिसातील रहिवासी. तिने युपीएससीच्या परीक्षेत ३१वा क्रमांक मिळवला आहे.छत्तीसगडमधील भिलाई येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्याचे वडील भिलाई स्टील प्लांटमध्ये काम करत होते, तर आई शिक्षिका होती.

तिला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. त्यामुळे तिने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. सिमी यांनी २०१९ साली आयआयटी बॉम्बेमधून इंजिनियरिंग पूर्ण केले. आयआयटी आणि जेईई यांसारख्या परीक्षा उत्तीर्ण केली. आयआयटी बॉम्बेमधून पदवी प्राप्त केल्यानंतर केल्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली. याच दरम्यान तिला सिमी यांना खूप मोठ्या कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची ऑफर आली होती.

परंतू, आपले ध्येय पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.ती दिवसाला किमान ८ ते १० तास अभ्यास केला. त्यांनी नेहमी अभ्यासाच्या गुणवत्तेवर लक्ष दिले. या तिच्या प्रयत्नांना यश आले.तिने अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. इतकेच नाहीतर आयएएस ऑफिसर पद मिळवले. मित्रांनो, आपली आवड ही करिअरची संधी झाली तर अधिकाधिक उंची गाठता येते.

Related Articles

Back to top button