UPSC IAS Success Story : प्रत्येकजण आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस होण्यासाठी धडपडत असतो. यात काहींना यश येते तर काहींना अपयश येते. यामागे बराच कठोर परिश्रम आणि सातत्य असते प्रथम नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि नंतर त्यांच्या पदांवर काम करण्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम हे नक्कीच कौतुकास्पद असतात. अशाच एका IAS अधिकाऱ्याबद्दल वाचा… ज्याने आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिले पण विजय मिळवला.
IAS के जयगणेश यांनी अनेक लोकांसमोर एक उदाहरण ठेवले आहे. जयगणेश हे गरीब आर्थिक पार्श्वभूमीतून आला आहे, त्याला एका हॉटेलमध्ये बरीच वर्षे वेटर म्हणूनही काम करावे लागले. पण २००८ मध्ये युपीएससीच्या परीक्षा ऑल इंडिया रँक (AIR) १५६ ने उत्तीर्ण केली.चांगल्या उत्पन्नासाठी त्याला चांगली नोकरी हवी आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी मेहनत घेतली.आपल्या स्वप्नाच्या दिशेने काम करायला सुरुवात केली. हा त्यांचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता.
वेल्लोर जिल्ह्यातील विनावमंगलम नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या आणि वाढलेल्या के जयगणेशची आर्थिक पार्श्वभूमी गरीब होती. त्याचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसे तरी कुटुंबाचे पालनपोषण करत होते. जयगणेश नेहमी आपल्या गावातील लोकांच्या दयनीय स्थितीचा विचार करायचे. त्याच्या गावातील लोक गरीब होते आणि त्याला आपल्या गावातील लोकांना मदत करायची होती.एका गरिबीने ग्रासलेल्या कुटुंबातून आलेला ते त्याच्या गावातील शाळेत आठवी इयत्तेपर्यंत शिकला आणि दहावी पूर्ण केल्यानंतर जयगणेशने पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कारण ते दहावी उत्तीर्ण होताच त्याला नोकरी लागेल असे सांगण्यात आले.
तेथे त्याने ९१ टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर पेरियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला एका कंपनीत नोकरीही लागली. पण स्पर्धा परीक्षेचे खूळ डोक्यात होते. जयगणेश सहा वेळा आयएएस परीक्षेला बसले होते पण त्यात ते यशस्वी झाले नाही. २००८ मध्ये त्यांना इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये पद मिळाले. खूप विचार व अभ्यास केल्यानंतर, त्याने शेवटी सातव्यांदा युपीएससीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी त्याने २००८ मध्ये AIR १५६ रॅंक सह परीक्षा उत्तीर्ण केली.