⁠
Inspirational

घरच्यांची साथ आणि अभ्यासामुळे IAS कनिष्क झाले टॉपर !

कनिष्कच्या घरचे वातावरण हे आधीपासूनच शैक्षणिक होते. त्यामुळे त्याने देखील अहोरात्र अभ्यास करून पावलावर पाऊल टाकत प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. यूपीएससी परीक्षा मधील टॉपर कनिष्क कटारिया यांचे कुटुंबच सिव्हील सर्व्हिसमध्ये आहे.

कनिष्क कटारिया हा राजस्थानमधील जयपूरमध्ये राहणारा लेक. कनिष्क यांचे वडील सांवरमल वर्मा एक IAS अधिकारी आहे. ते सध्या राजस्थान सरकारमध्ये सामजिक न्याय विभागाचे संचालक आहेत. त्यांचे काका के सी वर्मा जयपूरचे विभागीय आयुक्त आहेत. कनिष्क लहाणपणापासून आपले वडील आणि काका यांना वरिष्ठ अधिकारी म्हणून पाहत आले आहे.मुंबईतून संगणक शास्त्रात इंजिनिअरींग पूर्ण केले. त्यानंतर त्यांना विदेशात वार्षिक एक कोटी पॅकेज असणारी नोकरी मिळाली.

दक्षिण कोरियातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही वर्षांनी ते भारतात परतले आणि बेंगळुरू येथील एका अमेरिकन स्टार्टअपमध्ये रुजू झाले. कनिष्क कटारिया या नोकरीतून खूप चांगला पगार मिळवत होते, पण त्यांनी नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्याचा जेव्हा कनिष्क यांनी निर्णय घेतला, तेव्हा कुटुंबियांनी साथ दिली. कनिष्कने काही महिने दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये यूपीएससीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर सेल्फ स्टडीसाठी कोटा येथे गेले.

त्यानंतर कोणतेही कोचिंग न लावता पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली. त्यांनी २०१८-१९ मध्ये ऑल इंडिया रँक १ मिळवला आणि त्यांना मेहनतीचे फळ मिळाले. कनिष्क कटारिया यूपीएससी टॉपर – आयएएस अधिकारी बनले.

Related Articles

Back to top button