---Advertisement---

अवलियाने एक-दोन नव्हे तर, तब्बल तीन वेळा परीक्षा देऊन बनला आयएएस अधिकारी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story जोपर्यंत आपले स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत जिद्दीने अभ्यास करत करत, स्वप्नांच्या मागे धडपडले पाहिजे. हेच आयएएस कार्तिक जीवानी यांनी साध्या करून दाखवले आहे. काही झाले तरी हार न मानणार्‍या कार्तिक जीवानी यांनी त्यावेळीही परीक्षेच्या बाबतीत असाच दृढ निश्चय मनाशी बाळगला. त्यांनी एकदा नव्हे तर तीनदा पास होऊन अखेर आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

कार्तिक हा गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहे. त्याने विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर जेईई मुख्य परीक्षेला बसून आयआयटी मुंबईमध्य प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्याने नागरी सेवा परीक्षा देण्याचे ठरवले. मात्र, पहिल्याच प्रयत्नानंतर चांगली तयारी करूनच सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसणे योग्य ठरेल, हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने त्या दृष्टीने अभ्यास केला.

---Advertisement---

कार्तिकने २०१७ मध्ये प्रथमच नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळवले. इतकेच नाहीतर तो देशातून ९४वा आला. तेव्हा त्यास आयपीएस हे पद मिळाले.त्याने पुन्हा अभ्यासास सुरुवात केली. २०१९ मध्ये तो पुन्हा एकदा परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि आणि यावेळी देशातून ८४ वा) क्रमांक मिळवला. पण कार्तिकचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा अभ्यास सुरु केला. दरम्यान त्याचे आयपीएस पदासाठी प्रशिक्षणही सुरु होते. अभ्यासासाठी १५ दिवसांची रजा घेऊन तो आपल्या घरी आला. सुट्टीच्या दिवसात दररोज १० तास अभ्यास केला. २०२० मध्ये कार्तिक पुन्हा परीक्षेला बसला. कठोर परिश्रम आणि पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा युपीएससीची परीक्षाही उत्तीर्ण केली. तेव्हा, तो संपूर्ण भारतातून आठवा क्रमांक झाला. अखेर, त्याचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

मित्रांनो, कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर शिस्तबद्ध असणे खूप गरजेचे आहे. आपले स्वप्न देखील निश्चित असेल तर यश हे मिळतेच.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts