UPSC Success Story युपीएससीमध्ये यशस्वी होण्यासाठी दृढनिश्चय अथक परिश्रम महत्त्वाचे असतात. याच जोरावर यशस्वी प्रवास करता येतो. कोलकाताची नेहा बॅनर्जी (IAS Neha Banerjee) हे या प्रवासाचे उदाहरण आहे.
नेहाने कोलकाता येथील साऊथ पॉइंट हायस्कूलमधून तिच्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. तिच्या हुशारीमुळे ती आय.आय.टी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला आय.आय.टी खरगपूर येथे प्रवेश मिळाला. तिथे तिने इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी.टेकची पदवी मिळवली. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने खाजगी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.
नोकरी करत असताना युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. नेहाने पूर्णवेळ नोकरी करत युपीएससीची तयारी केली. मॉक इंटरव्ह्यू आणि ऑनलाईन सराव परीक्षा याचा सराव चालू ठेवला. यासाठी त्यांनी वेळेचे व्यवस्थापन केले. अभ्यास आणि ९ ते ५ नोकरी यातील समतोल राखत तयारी ठेवली. याच दरम्यान तिने समाज माध्यमांचा वापर बंद केला होता. फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते.
यूपीएससी परीक्षेचे पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी तिने १००% प्रयत्न केला. तिच्या या परिश्रमाला चांगले यश देखील आले.यूपीएससीच्या मुलाखतीला येण्यापूर्वी तिने नोकरीही सोडली. युपीएससीमध्ये लक्ष दिले. पण आधीच्या तयारीत एकीकडे नोकरी करत असताना आणि दुसरीकडे नागरी सेवा परीक्षांची तयारी करत असतानाही युपीएससीच्या परीक्षेत २०वा क्रमांक पटकावला.सध्या त्या पश्चिम बंगाल केडरमधील एक IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.