UPSC IAS Success Story : IAS अधिकारी प्रतिभा वर्मा यांची कहाणी जिद्द आणि चिकाटीची आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील प्रतिभा वर्मा यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेमध्ये तिसरा क्रमांक मिळवला.
प्रतिभाची आई उषा वर्मा प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे, तर वडील सुदांश वर्मा उच्च माध्यमिक शाळेत शिकवतात. प्रतिभाचा मोठा भाऊ खाजगी नोकरी करतो, तिच्या लहान भावाने बीटेक केले आहे आणि तिची बहीण डॉक्टर आहे. यूपी बोर्डाच्या शाळेतून दहावी आणि सीबीएसई बोर्डातून बारावी पूर्ण केल्यानंतर, ती आयआयटी दिल्लीमधून बी.टेक पूर्ण करण्यासाठी दिल्लीला गेली.
त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यात तिच्यासाठी सर्वात मोठा अडथळा होता की ती हिंदी माध्यमात होती. मात्र, २०१८ मध्ये तिला डेंग्यू झाला आणि २०१९ मध्ये तिला टायफॉइड झाला. आजारपणामुळे तिला तिच्या अभ्यासावर आणि मुलाखतीवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते. कोविड-१९ महामारीमुळे मुलाखत दोन महिन्यांनी मुलाखत असल्यानंतर पुढे मोठे आव्हान तयार झाले. एवढ्या सगळ्या समस्यांना तोंड देऊन देखील २०१९ मध्ये, तिने ज्या गोष्टींवर लक्ष ठेवले होते ते तिने यशस्वीरित्या साध्य केले. अखेर, तिसर्या प्रयत्नात ती आयएएस ऑफिस बनण्यात यशस्वी झाली.