⁠  ⁠

तीनवेळा अपयशी येऊनही न खचता हिंमतीने मिळवले IAS पद !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story पूज्य प्रियदर्शिनी हिचा प्रवास अनेक तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. युपीएससी परीक्षा सोडण्याचा विचार करण्यापासून ते २०१८ मधील याच परीक्षेतील ११वा क्रमांक….या संपूर्ण प्रवासात तिला कुटूंबाची खंबीर साथ मिळाली. अपयशावर मात करत जिद्दीने हे यश संपादन केले.

पूज्य हिने दिल्लीतील वाणिज्य शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मास्टर्स झाल्यावर पूज्य नोकरीत रुजू झाली आणि जवळपास अडीच वर्षे एका चांगल्या कंपनीत नोकरी केली. दोन वर्षांच्या कामाच्या अनुभवासह तिच्या अभ्यासाचा समतोल साधत तिने यूपीएससीची तयारी सुरू ठेवली.

तिने ह्यासाठी २०१३ पासून तयारीला सुरुवात केली. सुरुवातीला अपयशाला सामोरे जावे लागले. निश्चिंतपणे, तिने तीन वर्षांचा ब्रेक घेतला आणि नंतर मुलाखत फेरी गाठण्यासाठी २०१६ मध्ये सज्ज झाली. पण अपयश आले. मग तिने मागे वळून बघितले नाही..तिच्या कुटुंबाच्या अतुलनीय पाठिंब्यानेच तिचा आणखी एक प्रयत्न करण्याचा निर्धार पुन्हा तयार झाला. अखेर तिची २०१८ मध्ये चौथ्या प्रयत्नात निवड झाली.तिला आय.ए.एस हे पद मिळाले. कठोर परिश्रम, संयम आणि चिकाटी यामुळे तिला हे यश संपादन झाले.

Share This Article