⁠  ⁠

समस्यांचा डोंगर समोर उभा असतानाही बनली IAS अधिकारी ! रितिकाच्या जिद्दीची कहाणी एकदा वाचाच..

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story : काही लोकांना अगदी लहान वयातच प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागते. परंतू ते या सगळ्यांना सामोरे जात परिस्थितीवर मात करत यश मिळवतात. अशीच एक प्रेरणादायी जीवन कहाणी आहे IAS रितिका जिंदलची…

पंजाबच्या मोगा शहरातील रितिका तिच्या शालेय जीवनात तिच्या अभ्यासात उत्कृष्ट होती. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमध्येच झालं. सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेत, रितिका संपूर्ण उत्तर भारतात सर्वाधिक गुण मिळवून टॉपर आली होती. त्यानंतर तिने दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिक्षण घेतले. पदवीच्या तिसऱ्या वर्षापासून रितिकाने यूपीएससीची तयारी सुरू केली. रितिकाने ग्रॅज्युएशनमध्ये ९५ टक्के गुण मिळवले आहेत.

अशा परिस्थितीत, युपीएससीच्या परीक्षेत वाणिज्य आणि लेखापाल यांना पर्यायी विषय म्हणून निवडले होते.कॉमर्स अँड अकाउंटन्सी या विषयात ५०० पैकी ३०० गुण मिळाले आहेत. या परीक्षेआधी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पहिल्यांदा परीक्षा देताना वडिलांना जीभेचा कॅन्सर आणि त्यानंतर दुसऱ्यांदा फुफ्फुसांचा कॅन्सर झाला होता. अशा परिस्थित स्वत: मनानं खचून न जाता आणि घरच्यांनाही आधार देऊन त्यांनी आपलं लक्ष्य गाठलं. हॉस्पिटलमध्ये तिच्या वडिलांची देखभाल करताना तिने तिच्या अभ्यासात सातत्य ठेवले.

जर तुम्ही हरलात तर तुमच्यात लढण्याची हिम्मत येईल. यातही ती पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरली. २०१९ मध्ये तिच्या दुसऱ्या प्रयत्नात, रितिकाने शेवटी बाविसाव्यावर्षी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून, ८८ वी रँक मिळवली आणि ती आय.ए.एस अधिकारी झाली.

Share This Article
Leave a comment