⁠  ⁠

आई – वडीलांचे छत हरपले तरी अनेक अडचणींना सामोरे जात रितिकाची IAS पदी गगनभरारी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC IAS Success Story : युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे ही सर्वात कठीण बाब असते‌. जिद्दीची आणि संघर्षाची देखील ही निराळी परीक्षा. हा संपूर्ण प्रवास पार करत यश मिळवणे सोपे नाही पण रितिकाने करून दाखवले. पंजाबमधील (Punjab) मोगा येथे जन्मलेल्या रितिका जिंदाल (IAS Ritika Jindal) . रितिका जेव्हा पहिल्यांदा युपीएससी परीक्षेसाठी बसली तेव्हाच तिच्या वडिलांना जिभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले.

अडचणी इथेच थांबल्या नाहीत. जेव्हा ती दुसरा प्रयत्न करत होती तेव्हा वडिलांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला. इतक्या अडचणी असताना देखील वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खंबीरपणे उभी राहिली. रितिका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. शैक्षणिक जीवनात तिने अव्वल स्थान पटकावले. इतकेच नाहीतर पदवी परीक्षेत तिने ९५ टक्के गुण मिळवले होते. यानंतर रितिकाने यूपीएससीची तयारी सुरू केली.रितिका पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचली होती. पण तिला अपयश आले. रितिकाने २०१८ मध्ये दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली.

ती हॉस्पिटलमध्ये वडिलांची काळजी घेत युपीएससीची तयारी केली होती.तिने आपल्यातील उणिवा दुरुस्त केल्या. पुन्हा यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. या प्रयत्नात ती ८८व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तिच्या आयुष्यात अनेक अडचणी असतानाही रितिकाने आयएएस होऊन स्वप्न पूर्ण केले. हॉस्पिटलमध्ये वडिलांची काळजी घेत तिने ह्या परीक्षेची तयारी केली होती. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आय.ए.एसचे प्रशिक्षण घेत असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. इतकंच नाही तर रितिकाच्या आईचेही वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांत निधन झाले.

तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्षमय प्रवास अनुभवला. पण तिने कधीच ज्या गोष्टी नाहीत त्याची तक्रार केली नाही. उलट ज्या आहेत त्यातच समाधानी राहून त्याच्याच मदतीने ही कठीण परीक्षा पास केली. रितिकाला तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो संघर्ष करावा लागला ते ऐकून तुम्हालाही अंगावर काटा येईल.आई-वडील दोघेही आपल्या मुलीचे यश पाहू शकले नाहीत. हा काळ जरी मोठा असला तरी रितिकाच्या या प्रवासाला सलाम.

Share This Article