⁠  ⁠

अनेकवेळा अपयश आले, पण ध्येयाचा पाठलाग करून रूहानी बनली आयएएस अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story : भारतीय प्रशासकीय सेवेत गेल्यावर रूहानीचे स्वप्न साकार झाले आहे. रुहानी लहानपणापासून हुशार होती. हे तिचा शैक्षणिक प्रवास बघितला की अधिक जाणवते. तिचे‌ शालेय शिक्षण हे गुडगावमधील एका खाजगी शाळेत झाले. तिने दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तिथे तिने अर्थशास्त्रात पदवी प्राप्त घेतली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. पण चारवेळा अपयश आले.

तरी अडथळ्यांना न जुमानता रुहानी निश्चयी राहिली. ती प्रयत्न करत राहिली. प्रत्येक वेळी तिला फक्त काही गुणांमुळे अपयश जात होते. अखेर तिची आयपीएस पदी निवड झाली. पण तिला आय.ए.एस व्हायचे होते. अखेर, तिने सहाव्या प्रयत्नात रुहानीने तिच्या अतूट दृढनिश्चयामुळे आणि दृढ इच्छाशक्तीमुळे अखेरीस आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय गाठले. आपल्या अडचणीवर मात करून आपल्या ध्येयाचा पाठलाग केल्यास समाधान मिळते हे यातून दिसून आले.

आधीपासून भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी म्हणून सेवा करत असूनही, रूहानी यांना IAS अधिकारी पदाची आकांक्षा होती. या वाटेत अनेक आव्हानांना तोंड देत तिने रुहानी आपल्या निर्धारावर ठाम राहिली आणि प्रयत्न करत राहिली.

Share This Article