---Advertisement---

नैराश्यावर मात करत शिशिर गुप्ता बनले IAS अधिकारी; वाचा ही जिद्दीची कहाणी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : स्पर्धा परीक्षा देताना कधी यश येते तर कधी अपयश… पण दोन्ही गोष्टी पचवता आल्या पाहिजेत. कारण, ही स्पर्धा आहे. यात टिकायचे तर हे जमायला पाहिजे. अशाच प्रवासात शिशिर यांना दोनदा अपयश आले, त्यांनी आत्महत्येची पण प्रयत्न केला होता. पण जिद्दीने पुन्हा एकदा तयारी केली आणि IAS अधिकारी बनले.
कोण आहेत IAS शिशिर गुप्ता?

आय.ए.एस अधिकारी शिशिर गुप्ता हे २०२० या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या जम्मू-काश्मीरमधील रामनगर, उधमपूर येथील एसडीएम म्हणून कार्यरत आहेत. शिशिर गुप्ता यांचा जन्म जयपूर, राजस्थान येथे झाला. तेथूनच त्यांनी उच्च शिक्षण घेतले. लहानपणीच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. तथापि, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) पास केली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), बॉम्बे येथे गेले. जेथे त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्याने आयआयटी- बॉम्बे मधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली.

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्याला अबुधाबीमध्ये उच्च पगाराची नोकरी मिळाली. २०१३ ते २०१५ पर्यंत इंजिनिअर म्हणून बिल्फिंगर टेबोडिन येथे त्यांनी जवळपास दोन वर्षे काम केले. त्यानंतर आयएएस अधिकारी बनण्याचे त्यांचे बालपणीचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याने त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांना २०१६च्या पहिल्याच प्रयत्नात अपयश आले. ते मुलाखतीच्या टप्प्यावर पोहोचले पण पुढे जाऊ शकले नाहीत. त्यानंतर, त्याने २०१७ मध्ये दुसरा प्रयत्न केला परंतू पुन्हा एकदाअयशस्वी झाला. सलग दोन प्रयत्नांत अपयश आल्यानंतर त्याला नैराश्य येऊ लागले. त्याला वाटले की त्याची तयारी तही परीक्षा पास करण्यास मदत करण्यासाठी पुरेशी नाही.त्यांनी आत्महत्येचा विचारही केला होता.

पण दोन वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर तेही डिप्रेशनमध्ये गेला. पण कुटुंबाकडून मिळालेले धैर्य त्याला प्रेरणा देत राहिले. शेवटी, २०१९ मध्ये युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. IAS शिशिर गुप्ता यांनी ऑल इंडिया रँक (AIR) ५० मिळवला.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts