---Advertisement---

रेल्वे अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावले ; पण जिद्दीने IAS पद कमावले!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story आपण कोणतेही संकट आले तरी घाबरून जातो पण त्यावर मात करत यश गमवायला धमक लागते.आपल्या अडचणींपुढे हात टेकणाऱ्या अनेकांसमोर सूरज तिवारीने एक उदाहरण ठेवलं आहे. कितीही समस्या आल्या तरी प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतं हे त्याने दाखवून दिलं आहे. त्यांनी मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर युपीएससीच्या परीक्षेत ९१७ क्रमांक पटकावला आणि आय.ए.एस अधिकारी झाला.

त्याचे वडील शिलाईचा छोटेखानी व्यवसाय करतात. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सूरजने कष्टाची जाणीव ठेवली. त्याचे शालेय शिक्षण हे महर्षी परशुराम शाळेत झाले.तर त्याने मैनपुरी मधून दहावी – बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.लहानपणापासूनच हुशार सूरज तिवारी अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी करत राहिला. पण२४ जानेवारी २०१७ रोजी दादरी-गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुरजने त्याचे दोन्ही पाय, उजव्या आणि डाव्या हाताची बोटे गमावली होती.

यानंतर तो चार महिने रुग्णालयात राहिले, त्यानंतर तीन महिने घरीच विश्रांती घेतली. यानंतरही सुरजने हार मानली नाही. अपघातानंतर २०१८ मध्ये त्याने जेएनयू दिल्लीत बी.एमध्ये नव्याने प्रवेश घेतला. तेथून २०२१ साली बी. ए पास करून एम.एला प्रवेश घेतला.या सोबत युपीएससीचा देखील अभ्यास चालू ठेवला. त्याने मेहनत करत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे यश संपादित केले आहे. अखेर, तो‌ आय.ए.एस अधिकारी झाला.

मित्रांनो, तुम्ही देखील कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नका. प्रयत्न करत रहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts