⁠  ⁠

स्वप्न पूर्ण होतात फक्त परिश्रम घेतले पाहिजे; वाचा IAS तपस्या परिहार यांची यशोगाथा!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story आयएएस अधिकारी होणे हे अनेकांचे स्वप्न असते. यातही केवळ काही लोक हे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होतात. कारण, युपीएससीची नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. परंतू कठोर परिश्रम आणि योग्य वेळेचे व्यवस्थापन असेल तर कोणतीही व्यक्ती ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका व्‍यक्‍तीबद्दल सांगणार आहोत, त्या म्हणजे आयएएस तपस्या परिहार.

तपस्या परिहार या मध्य प्रदेश केडरच्या २०१८ बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात २०१७ मध्ये UPSC CSE परीक्षा ऑल इंडिया रँक (AIR) २३ सह उत्तीर्ण केली. त्यांची पहिल्याच प्रयत्नात UPSC प्रिलिम्स पास होऊ शकली नाही.

IAS तपस्या ह्या मध्य प्रदेशातील नरसिंगपूरची आहे. त्यांने शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले. तर, पुण्यातील इंडियन लॉ सोसायटीच्या लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच प्रयत्नात तिला प्रिलिम्सही पूर्ण करता आले नाहीत.पण त्यांच्या सातत्य आणि कठोर परिश्रमाने ही तयारी सुरू ठेवली. अखेर या कष्टाचे चीज झाले आणि त्या आय.ए.एस अधिकारी झाल्या. त्यांचा विवाह IFS अधिकारी गरवित गंगवार यांच्याशी झाला आहे.

Share This Article