UPSC IAS Success Story स्पर्धा परीक्षेसाठी संयम खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी हरून चालत नाही तर लढावे लागतेच. अशीच, उमा हारथीची एक कहाणी आहे, जिने आशा सोडली नाही आणि पाच प्रयत्नानंतर IAS अधिकारी बनली.
आयआयटी हैदराबाद अभियांत्रिकी पदवीधर उमा हाराठी या तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील आहेत. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिचा हा प्रवास तिच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. उमाने आधी दोनदा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तिचा तिसरा प्रयत्न देखील मुख्य परीक्षेत अयशस्वी ठररा. पण तिचा चौथा प्रयत्न टर्निंग पॉइंट ठरला. या अपयशामुळे उमाला आत्मनिरीक्षण करण्याची आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळाली, ज्यामुळे ती परीक्षा यशस्वीपणे पूर्ण झाली. तिने अपयशाला संधी म्हणून बघितले.
नारायणपेठचे पोलीस अधीक्षक असलेल्या तिच्या वडिलांनी उमा यांना नागरी सेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. ते उमाला नेहमी सांगत राहिले की हे एक उत्तम व्यासपीठ आहे – एक करिअर आणि एक व्यासपीठ जिथे मी काहीतरी अर्थपूर्ण करू शकते. त्यामुळे तिने जिद्द सोडली नाही. ती चौथ्या प्रयत्नात देखील अपयशी ठरली. पण तिने पुन्हा जोमाने अभ्यास केला. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे, विश्लेषण करणे आणि सराव हे चालू ठेवले. अखेर या कठीण अशा युपीएससीच्या परीक्षेत पाच प्रयत्नांनंतरही ती तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिला आय.ए.एस हे पद देखील मिळाले.