⁠  ⁠

वाढते आजारपण, झोपडट्टीमधील बालपण.. पण उम्मल जिद्दीने झाली IAS अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC IAS Success Story : कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते. उम्मूल खेर यांचा जन्म राजस्थानच्या पाली मारवाड येथील एका गरीब कुटुंबात झाला. तिच्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे त्रिलोकपुरीच्या झोपडपट्टीत गेली. तिचे वडील कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कपडे विकण्याचे काम करत असतं.तिचे माध्यमिक शिक्षण एका एनजीओच्या मदतीने पूर्ण केले.

हाडांच्या आजारामुळे आजारामुळे तिला आत्तापर्यंत एकूण १६ फ्रॅक्चर्स आणि तब्बल आठ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत.असे असले तरीही उम्मल खचून गेली नाही. नियतीच्या बंधनांना न जुमानता उम्मलने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.ट्यूशन चालवून जे पैसे मिळत त्यातून ती आपल्या शाळेचा खर्च भागवत असे. त्यांना इयत्ता दहावीत ९०१% टक्के गुण मिळाले होते. तर बारावीत त्या ८९% टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्या होत्या.ते. तिचा हा उत्तम शैक्षणिक प्रवास पुढे सुरू राहिला. पदवीचे शिक्षण उम्मलने दिल्ली विद्यापीठाअंतर्गत गार्गी महाविद्यालयात घेतले. यानंतर तिच्या मार्गात येणाऱ्या अनेक लहान-मोठ्या समस्यांचा सामना करत, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रतिष्ठित स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून पदव्युत्तर पदवी मिळवली.

कुटुंबाची एकूण आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींसाठी आपणही मदतीचा हातभार लावायला हवा याची समज लहान वयातच आली होती. त्यामुळे तिने स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला.स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उम्मलने तिचे राहते घर सोडले आणि दुसऱ्या झोपडीत स्वतंत्रपणे राहू लागली. तिथेच तिने स्वतःवर आणि अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली.कष्टाचे फळ हे कायमच गोड असते असे म्हणतात.या सगळ्यांबरोबर उम्मलने यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली. आयुष्यातील सर्व कठोर परिस्थितींना हिमतीने सामोरे जाऊन उम्मलने तिचे IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

यातून अभ्यासाचे नियोजन आणि व्यवस्थापन केले. यामुळेच तिचा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिने ४२० हा अखिल भारतीय रँक पटकावला होता. आता तिचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग खुला झाला.लहान वयापासूनच उम्मलची तब्येत काहीशी नाजूक होती. शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाच्या विरोध होता, घरच्यांच्या तीव्र विरोधाला आणि अशा कौटुंबिक परिस्थितीचा सामना करून उम्मल आय.ए.एस अधिकारी बनली.

Share This Article