UPSC IAS Success Story तेलंगणातील मिर्यालागुडा येथील रहिवासी वरुण रेड्डी यांनी साध्य करून दाखवली आहे. अनेक अपयशानंतर वडिलांची इच्छा आणि नंतर स्वत:च्याही उराशी बाळगलेल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सायन्स क्षेत्र निवडले. यात त्याने प्रतिष्ठित आयआयटी (IIT) बॉम्बेमधून संगणक विज्ञान विषयात बी.टेक. (B.Tech.) केलं. पुढे, वरुण रेड्डी यांनी अनोखा मार्ग निवडला.
वरुण रेड्डी यांचा हा प्रवास सोपा नव्हता. यूपीएससी – सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत (CSE) वरुण यांचा पहिलाच प्रयत्न अयशस्वी ठरला. तरीही त्यांनी निराश होण्याऐवजी स्वतःला दुसरी संधी दिली. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात १६६ व्या क्रमांकासह यश मिळवून भारतीय महसूल सेवा (IRS)मध्ये स्थान मिळवले.पण या पदावर समाधान नव्हते म्हणून त्याने पुन्हा परीक्षा देण्याचे ठरविले.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी होण्याच्या दृष्टीने आपले लक्ष केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षांवर केंद्रित केले.सऱ्या प्रयत्नात २२५ वी रँक आणि त्यानंतर अखेर चौथ्या प्रयत्नात खूप वरची म्हणजे सातवी रँक मिळवली. अशा रीतीने वरुण रेड्डी यांनी त्यांच्या वडिलांची दीर्घकाळापासूनची आकांक्षा पूर्ण केली आणि ते आयएएस अधिकारी बनले.सध्या, वरुण तेलंगणा स्टेट नॉर्दर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (TSNPDCL)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. त्यांनी यापूर्वी निर्मल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.