---Advertisement---

अथक परिश्रमानंतर वरुण रेड्डी बनले आयएएस अधिकारी; वाचा त्यांचा प्रवास…

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story आपल्याला अपयश आले की आपण लगेच खचून जातो. पण या अपयशासोबत सामना करण्याचे सामर्थ्य असते, गरजेचे आहे. अनेक अपयशांचा सामना करून तेलंगणातील मिर्यालागुडा येथील रहिवासी वरुण रेड्डी यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस यशस्वी झाले आहेत‌. वरूण हे लहानपणापासून हुशार होते. त्यांनी संयुक्त प्रवेश परीक्षेत (JEE) २९ वा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित आयआयटी (IIT) बॉम्बेमधून संगणक विज्ञान विषयात बी.टेक ही पदवी घेतली. पुढील कोणतेही शिक्षण किंवा खाजगी नोकरी न करता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे ठरवले.

त्यांनी अहोरात्र अभ्यास केला पण पहिलाच प्रयत्न अयशस्वी ठरला. तरीही त्यांनी निराश होण्याऐवजी स्वतःला दुसरी संधी दिली. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात १६६ व्या क्रमांकासह यश मिळवून भारतीय महसूल सेवा (IRS)मध्ये स्थान मिळवले. यावर त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.

यांनी न थांबता, तिसऱ्या प्रयत्नात २२५ वी रँक आणि त्यानंतर अखेर चौथ्या प्रयत्नात खूप वरची म्हणजे सातवी रँक मिळवली. अशा रीतीने वरुण रेड्डी यांनी त्यांच्या वडिलांची दीर्घकाळापासूनची आकांक्षा पूर्ण केली आणि ते आयएएस अधिकारी बनले. वडिलांची इच्छा आणि नंतर स्वत:च्याही उराशी बाळगलेल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts