⁠  ⁠

शिक्षणासाठी कित्येक किलोमीटर पायपीट केली ; वीर बनला IAS !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story : अनेक अडचणी, समस्यांचा डोंगर पार करत त्याने यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवणं, ही काही सोप्पी गोष्ट नाही आहे. पण उत्तर प्रदेशातील छोट्या गावात दलपतपूर येथे राहणाऱ्या वीर प्रताप सिंह राघवने करून दाखवले आहे.वीरचे वडील गावात शेती करतात. त्याची घरची परिस्थिती बेताची होती आणि त्याच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. त्याला, शाळेत जाण्यासाठी घरापासून पाच किलोमीटर अंतर होतं.

त्यावेळी गावात पूल नव्हता, त्यामुळे नदी ओलांडून त्यांना शाळेत जावं लागत होते.वीरचे शालेय शिक्षण हे आर्य समाज स्कूलमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर सहावी ते दहावीवीपर्यंत शिकारपूरच्या सरस्वती विद्या मंदिरात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. वीर यांनी मॅकेनिकल इंजिनिअर शिक्षण पूर्ण केले.पण त्यासाठी लागणाऱ्या पैशांचा प्रश्न समोर होता.

वीरच्या वडिलांनी मुलाला यूपीएससीची तयारी करायची आहे. त्यासाठी व्याजावर पैसे घेतले. आपल्या मुलावर विश्वास ठेवला.पहिल्या प्रयत्नात वीरला अपयश आलं. मात्र जिद्द न हरता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेला बसला. त्याने यासाठी अधिक मेहनत घेतली. मोठ्या भावाचंही आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी सीआरपीएफमध्ये नोकरी स्वीकारली. पण, वीरने करून दाखवलं. वीर प्रताप सिंहनं ९२ वा क्रमांक पटकावला आणि तो आय.ए.एस झाला.

Share This Article