UPSC Success Story : सर्वसाधारणपणे युपीएससीचा प्रवास हा सर्वांसाठी सारखा नसतो. प्रत्येकाच्या प्रवासाची एक कहाणी असते. अशीच विशाल कुमार यांची ही प्रेरणादायी कहाणी…
विशाल कुमार लहान असताना त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याचे वडील वारले. त्याचे वडील रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. वडिलांच्या निधनानंतर मुलाला शिकावयचे कसे? घरचा खर्च कसा निघणार? त्यामुळे, कोणताही पर्याय उरला नसल्यामुळे, त्याच्या आईनेही रोजंदारीचे काम केले. तसेच त्याच्या आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेळ्या आणि म्हशींचे पालनपोषण केले. पण आपल्या मुलाच्या शिक्षणात कधीही तडजोड केली नाही. आज तो आयएएस अधिकारी असून तिच्या आईला अभिमान वाटतो. हा प्रवास IAS विशाल कुमार यांचा प्रवास आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूर भागात जन्मलेल्या आणि वाढलेल्या आय.ए.एस विशाल कुमारचा प्रवास अडथळ्यांनी सामावलेला होता. वडिलांच्या मृत्यूनंतरही, त्याच्या आईने आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे यासाठी धडपड केली. विशालनेही आपल्या आईला निराश केले नाही आणि तो लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होता.
त्याने दहावी आणि बारावीत अव्वल स्थान मिळविले आणि नंतर आयआयटी कानपूर येथे प्रवेश मिळवला. आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. आयआयटी कानपूरमधून पदवी घेतल्यानंतर, त्याला रिलायन्स कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी केली.
मात्र, तिथे काम केल्यानंतर सरकारी अधिकारी होण्याच्या उद्देशाने नोकरी सोडून आयएएसची तयारी करण्याचा निर्णय घेतला. तो दिल्लीच्या मुखर्जी नगर येथे गेला आणि युपीएससीची तयारी केली. याच तयारीच्या जोरावर विशाल कुमार नागरी सेवा परीक्षा २०२१ मध्ये AIR- ४८४ रॅंक मिळवून उत्तीर्ण केली आणि आय.ए.एस बनला.
आज, तो अनेक इच्छुकांसाठी प्रेरणास्थान आहे. जे आपली स्वप्ने आणि आवड सोडून देण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांसाठी तडजोड करत आहेत. त्यांच्यासाठी हा प्रवास नक्कीच आदर्श ठरेल.