---Advertisement---

मुस्कान पहिल्याच प्रयत्नात झाली आय.एफ.एस अधिकारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IFS Success Story युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे सगळ्यांसाठी खरोखरच कठीण परीक्षा असते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नातही परीक्षा उत्तीर्ण होण्यात अडचण देखील अडचणी देतात.तर काही विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करतात आणि IFS, IPS आणि IAS अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. मुस्कानने देखील पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

मुस्कान जिंदाल ही मूळची सोलन, हिमाचल प्रदेशची आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करून केवळ तिच्या गावाचा अभिमानच वाढवला नाही तर २०१९ मध्ये ८७ क्रमांक मिळवला आहे.ती आता आय.एफ.एस अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

लहानपणापासूनच मुस्कान नेहमीच एक हुशार विद्यार्थिनी होती. तिला लहानपणापासून नागरी सेवेत रुजू होण्याची इच्छा होती. ती शाळेत आणि कॉलेजमध्ये टॉपर होती. तसेच तिने शालेय जीवनात देखील उत्तम कामगिरी केली. त्यानंतर तिने चंदीगडमधील पंजाब विद्यापीठाच्या एसडी कॉलेजमध्ये बी.कॉम (ऑनर्स) मध्ये प्रवेश घेऊन तिचे पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले. तिने तिच्या पदवी परीक्षेमध्ये पाचवा क्रमांक मिळविला. यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला. त्यासाठी ती नेहमी वर्तमानपत्रांचे वाचन करायची. तसेच तिने चालू घडामोडींकडे पण विशेष लक्ष दिले होते. तिच्या तयारीदरम्यान तिने तिचा फोन आणि सोशल मीडियाचा वापरही कमी केला. यामुळेच तिचे आय.एफ.एस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts