लातूरच्या कन्येची UPSC परीक्षेत बाजी; आयएफएससाठी झाली निवड
Success Story UPSC : प्रतिक्षाला लहानपणापासून अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी तिने ध्यास घेतला. त्या ध्यासापायी तिने स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. प्रतिक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे ही मूळची लातूर येथील रहिवासी. त्यांचे वडील नानासाहेब काळे हे लातूर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयात लेक्चरर होते. मागच्या वर्षी ते निवृत्त झाले. तर आई भाग्यश्री काळे या गृहिणी आहेत. तसेच त्यांची लहान बहीण आयटी इंजीनिअर असून एक मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करते.तिच्या घरच्यांनी तिला कायम पाठिंबा दिला.
तिने उच्च शिक्षण घ्यावे यासाठी तिला प्रोत्साहन दिले. तिचे पहिली ते सातवीचे शिक्षण हे लातूर येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय येथे झाले. तर आठवी ते दहावीचे शिक्षण हे सरस्वती विद्यालय लातूर येथे झाले. तर अकरावी- बारावीचे शिक्षण त्यांनी लातूर येथीलच राजर्षी शाहू महाविद्यालय येथे घेतले. तसेच एमएचटी-सीईटी परिक्षेत 200 पैकी 189 गुण होते. बारावीच्या शिक्षणानंतर कॉलेज ऑफ इंजीनिअरींग पुणे याठिकाणी त्यांनी मेकॅनिकल इंजीनिअरींगची पदवी घेतली.
त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. तिने जेव्हा पहिल्यांदा यूपीएससीची प्रीलिअम्स दिली. ती पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली.मात्र, तिला मुख्य परीक्षेतअपयश आले. तिने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. तिने २०१६ पासून नागरी सेवांसोबतच आयएफएसचाही फॉर्म भरायला सुरुवात केली. मात्र, दोन्ही परिक्षांच्या दबावामुळे २०१६च्या पूर्व परीक्षेतच मला अपयश आले. या सर्व अपयशातूनही तिला बरंच काही शिकायला मिळालं.
यानंतर २०१७ मध्ये ती पूर्व परीक्षा पुन्हा पास झाली. यानंतर आयएफएसची मेन्सही दिली. जसा अभ्यास वाढला तसं फॉरेस्ट सर्व्हिसेसचं महत्त्वं कळालं. तिने इतर कोणत्याही प्रकारचे कोचिंग किंवा क्लासेस लावले नाही. सेल्फ स्टडीवर भर दिला.तिला पुन्हा अपयश आले.पण नंतर तिची सहायक वनसंरक्षक (Assistant Conservator of Forests) म्हणून निवड झाली होती. त्याच्या दोन वर्षाच्या ट्रेनिंगसाठी ती तामिळनाडू राज्यातील कोइम्बतूर येथे होती. पुढे सहायक वनसंरक्षक म्हणून प्रोबेशन कालावधी सुरू झाल्यावर जानेवारी २०२३पासून पुन्हा यूपीएसीच्या तयारीला सुरुवात केली. यावेळी तिने फक्त आयएफएससाठीच तयारी केली. या अटेम्प्टमध्ये तिने पूर्व, मुख्य आणि मुलाखत आणि सर्व टप्पे पार केले आणि देशात दुसरा क्रमांक मिळवला.