⁠  ⁠

गरिबीशी लढले अन् स्पर्धा परीक्षेत जिंकले! वाचा IFS अधिकारी प्रिन्स यांची यशोगाथा !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

खरंतर गरिबीचा सामना करत किंवा कमी पैशांत जगणं शोधणं ही अवघड गोष्ट असते. पण प्रिन्स कुमार सिंग यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारला आणि आज ते आयएफएस अधिकारी आहेत. त्यांचा सरकारी नोकरीच्या दिशेने सुरू झालेला प्रवास सोपा नव्हता.त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती.वडील आसाम रायफल्समध्ये हवालदार आहेत आणि आई गृहिणी आहे. त्यामुळे महिन्याला थोड्या थोडक्या पैशांत कुटुंब चालत असे.

प्रिन्स कुमार सिंग यांचा जन्म बिहारमधील रोहतास येथे झाला.त्यांचे शालेय शिक्षण बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील भभुआ येथून केले. यानंतर त्यांनी एनआयटी जालंधर (पंजाब) येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले. ते २०१६-२०२० च्या बॅचचे विद्यार्थी होते. पदवी घेतल्यानंतर त्यांनी गुजरातमधील रसायन उद्योगात आठ महिने काम केले. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

यात अपयश येत होते.प्रिन्स कुमार सिंग यांनी तीन वेळा यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्या दोन प्रयत्नांत ते यूपीएससी प्रिलिम्स परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा विचार डोक्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. पण मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांना धीर दिला. पुन्हा अभ्यास कर… एकदिवस नक्कीच यश मिळेल हा पाठिंबा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता.

मग पुन्हा त्यांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. या मेहनतीच्या जोरावर २०२२ मध्ये ऑल इंडिया रँक १७७ मिळवला होता. यासह त्यांना दिल्लीत असिस्टंट ऑडिट ऑफिसर म्हणून सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर ६७ व्या बीपीएससी परीक्षेत त्यांना २२२ रँकसह बीडीओ पदावर पोस्टिंग मिळाली. त्यानंतर अखेर २०२३ मध्ये त्यांनी मुलाखतीचा टप्पा गाठला. त्याचवर्षी त्यांनी या परीक्षेत १५ वा क्रमांक मिळवला.

Share This Article